इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणे महागणार! 25 ऑगस्टपासून 50 टक्के रोड टॅक्स द्यावा लागणार

इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) खरेदी करणाऱया ग्राहकांना 25 ऑगस्टपासून 50 टक्के रोड टॅक्स भरावा लागणार आहे. राज्य सरकारच्या निर्देशांनुसार परिवहन विभागाने ईव्हीच्या खरेदीवर मिळणारी सूट समाप्त केली आहे. यामुळे आता दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी ईव्ही वाहनांच्या किमती 3 हजारांपासून 40 हजारांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. ही रक्कम वाहन खरेदी करणाऱया ग्राहकांना वाहनांच्या किमतीसोबत रोड टॅक्सच्या रूपात द्यावी लागणार आहे. ईव्ही पॉलिसीअंतर्गत 25 ऑगस्ट 2022 ते 24 ऑगस्ट 2024 पर्यंत रोड टॅक्समध्ये सूट देण्यात आली होती. परंतु आता ही सूट संपली आहे. नव्या आदेशानुसार, 25 ऑगस्ट 2024 ते 24 ऑगस्ट 2026 पर्यंत दुचाकी वाहनांवर 4 टक्के, तर कारवर 5 टक्के रोड टॅक्स द्यावा लागणार आहे. यानंतर 25 ऑगस्ट 2026 पासून 24 ऑगस्ट 2027 पर्यंत रोड टॅक्समध्ये केवळ 25 टक्के सूट मिळणार आहे. आतापर्यंत खरेदी करण्यात आलेल्या खासगी वाहनांच्या मालकांना

टॅक्स द्यावा लागणार नाही. परंतु कमर्शियल वाहनांच्या मालकांना वाहनांच्या क्षमतेनुसार टॅक्स भरावा लागणार आहे. देशात पेट्रोल आणि डिझेल वाहनांच्या तुलनेत इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती भरमसाठ आहेत.
इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणे अनेकांना परवडत नसल्यामुळे सुरुवातीच्या काळात पेंद्र आणि राज्य सरकारकडून वाहनांच्या खरेदीवर सूट दिली जात होती. तरीसुद्धा वाहनांच्या किमती 10 लाखांच्या पुढे आहेत. आता ग्राहकांना अतिरिक्त पैशांचा भुर्दंड बसणार आहे.

रोड टॅक्सचे दर

दुचाकी वाहनांच्या एपूण किमतीवर 8 टक्के रोड टॅक्स

कारच्या एपूण किमतीवर 10 टक्के रोड टॅक्स

तीनचाकी वाहनांवर दीड ते तीन टक्के रोड टॅक्स

मालवाहतूक वाहनांवर 5 ते 6 टक्के रोड टॅक्स

वाहनांवर 24 ऑगस्टपर्यंत सूट

परिवहन विभागाने सर्व ऑटोमोबाईल डीलर्सला नव्या रोड टॅक्ससंबंधी माहिती देणारा आदेश पाठवला आहे. रोड टॅक्समधील सूट ही केवळ 24 ऑगस्टपर्यंत वाहन खरेदी करणाऱयाला मिळू शकते. यानंतर खरेदी केलेल्या वाहनांवर दोन वर्षांपर्यंत 50 टक्के आणि त्यानंतर 75 टक्के रोड टॅक्स द्यावा लागणार आहे.