भय इथले संपत नाही… भायखळा जेलमधील 44 महिला कैद्यांना कोरोना

भायखळा जेलमधील 44 महिला कैद्यांना कोरोना झाला असून त्यांच्यातील एका गर्भवती महिलेवर फोर्टमधील कामा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, या सर्व महिलांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नसून त्यांची व्यवस्था जेलच्या बाजूला असलेल्या ई. एस. पाटणवाला शाळेतील कोरोना क्वारंटाईन सेंटरमध्ये करण्यात आली आहे. दरम्यान, या कैद्यांच्या चार मुलांनाही कोरोनाची लागण झाली आहे, अशी माहिती ‘ई’ विभागाचे आरोग्य अधिकारी डॉ. शैलेंद्र गुजर यांनी दिली.

मुंबई महापालिकेच्या ‘ई’ विभागाकडून 16 सप्टेंबरला भायखळा मध्यवर्ती तुरुंगात कोरोना चाचणी करण्यात आली. त्यावेळी एका महिलेला ताप आल्याचे आढळले. त्यानंतर 17 सप्टेंबरला महापालिकेने तिथे चाचणी केली असता त्यातील तीन महिलांना कोरोना झाल्याचे आढळले. यातील एक महिला गर्भवती होती. तिला कामा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महापालिकेने तुरुंगात 18 तारखेला आरोग्य शिबीर घेत 97 जणांची चाचणी केली. त्यात 36 महिला पैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले. 19 तारखेला आणखी 250 महिलांची चाचणी केली असता त्यात 4 महिला पॉझिटिव्ह सापडल्या. त्यांची व्यवस्था जेलच्या बाजूला फक्त पैद्यांसाठी तयार करण्यात आलेल्या ई. एस. पाटणवाला शाळेतील क्वारंटाइन सेंटरमध्ये करण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ. शैलेंद्र गुजर यांनी दिली.


पॉझिटिव्ह आलेल्या चार मुलांची आज नायरमधील डॉक्टरांनी येऊन तपासणी केली. त्यांच्यातही कोणती लक्षणे आढळलेली नाहीत. त्यामुळे ही मुले पाटणवाला शाळेत त्यांच्या आईकडेच राहणार आहेत. या सर्वांची पुन्हा 14 दिवसांनी कोरोना चाचणी केली जाणार आहे.
z डॉ. शैलेंद्र गुजर, आरोग्य अधिकारी, ‘ई’ वॉर्ड

आपली प्रतिक्रिया द्या