सीए परीक्षेत प्राची केशन ‘टॉपर’

212

सामना प्रतिनिधी । नागपूर

इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) ने मंगळवारी दुपारी सीए अंतिम वर्षाचे निकाल जाहीर केले. निकालात शहरातील वर्धमाननगरची प्राची केशनने २३वी ऑल इंडीया रँक मिळविली. प्राची नागपूर शहरातून अव्वल ठरली. तिने एकूण ६८.८८ टक्के गुण प्राप्त केले. तर ६१.२५ टक्क्यांसह प्रियल सारडा शहरातून दुसरा ठरला. तर विकास जन्गाळेने तृतिय क्रमांक पटकाविला. त्याने ६०.७५ टक्के गुण मिळविले. मे महिन्यात झालेल्या या परीक्षेमध्ये देशभरातील ३६८ केंद्र आणि दुबई, अबूधाबी, मस्कॉट आणि काठमांडूतील चार केंद्रावरही ही परीक्षा आयोजित केली होती. एकूण एक लाख ३२ हजार ७ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. मंगळवारीच जून महिन्यात झालेल्या कॉमन प्रोफिशियन्सी टेस्टचा सुद्धा निकाल आयसीएआयने जाहीर केला. देशारातून ९३ हजार २६२ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.

सुरूवातीपासूनचे ‘सीए’ बनायचे होते : प्राची केशन

सुरूवातीपासूच सीए बनण्याचे ध्येय होते. हे लक्षात घेऊन पूर्ण तयारी केली. सीए ची प्रत्येक परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केली. आता पुढे कॅम्पस प्लेसमेंटची तयारी करायची आहे. उत्कृष्ट कंपनीत नोकरी मिळावी हे स्वप्न असल्याचे शहरातील ‘टॉपर’ प्राची केशनने सांगितले. वडील अॅड. सुनील केशन आणि आई गुणिता केशन यांनी नेहमी पुढे जाण्यासाठी प्रेरणा दिली. सीए ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी नियमित स्टडी मटेरियल ऐवजी प्रॅक्टिस मॅनुअल, मॉक टेस्टवरही भर द्यावा, यश नक्की मिळेल, असा विश्वास प्राचीने व्यक्त केला.

आपली प्रतिक्रिया द्या