नागरिकत्व विधेयक लागू करण्यास ‘या’ राज्यांनी दिला नकार

2307

पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातून हिंदुस्थानात आलेल्या बिगर मुस्लिम निर्वासितांना हिंदुस्थानचे नागरिकत्व बहाल करणारे नागरिकत्व सुधारणा विधेयक लोकसभेत आणि राज्यसभेत मंजूर झाले आहे. मात्र असं जरी असलं तरी हे विधेयक केरळ, पश्चिम आणि पंजाबमध्ये लागू करण्यात येणार नाही.

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी हे विधेयक म्हणजे हिंदुस्थानच्या धर्मनिरपेक्षतेवरील हल्ला असल्याचं सांगत आमच्या राज्यात हे विधेयक लागू करण्यात येणार नसल्याचे जाहीर केले आहे. याआधी केरळ आणि पश्चिम बंगाल सरकारनेही हे विधेयक लागू करणार नसल्याचं जाहीर केलं आहे.

या विधेयकावर टीका करत केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन म्हणाले आहेत की, ‘नागरिकत्व दुरुस्ती विधेयक असंविधानिक असून केंद्र सरकार देशातील जनतेमध्ये धार्मिक आधारावर फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे’. तर पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या सरकारमधील मंत्री डेरेक ओ ब्रायन यांनी पश्चिम बंगालमध्ये एनआरसी आणि कॅब दोन्ही लागू केले जाणार नाहीत, असे स्पष्ट केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या