महिला वकीलासमोरच टॅक्सी ड्रायव्हर करत होता हस्तमैथून

2083

हरयाणात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक टॅक्सी ड्रायव्हर महिला वकीलाच्या समोरच हस्तमैथून कर होता. याप्रकरणी महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी ड्रायव्हरला अटक केली आहे.

हरयाणाच्या गुरूग्रामध्ये महिला वकीलाने ऍपमधून टॅक्सी बूक केली होती. महिलेला कोर्टात जायचे होते. महिला टॅक्सी बसल्यानंतर ड्रायव्हर आरशातून सतत महिलेकडे बघत होता. त्यामुळे महिलेला अस्वस्थ वाटायला लागले. नंतर तर ड्रायव्हरने कहरच केला. चालत्या गाडीत ड्रायव्हर हस्तमैथून करायला लागला. त्यामुळे महिला चांगलीच घाबरली. गंतव्य ठिकाणी ड्रायव्हरने सोडल्यानंतर महिलेने पोलिसांना तत्काळ फोन केला आणि घटनेची माहिती दिली. पोलिसांनी आरोपीला पकडून त्याची गाडी जप्त केली.

आपली प्रतिक्रिया द्या