‘तुमचा अहंकार तुमच्या खिशात ठेवा…’, कॅब चालकाने प्रवाशांसाठी बनवले अनोखे नियम

सोशल मीडियावर रोज नवनवीन व्हिडीओ – फोटो व्हायरल होत असतात. या व्हिडीओवर काही लोकांची सहमती असते कर काहींना हे फोटो व्हि़डीओ न आवडल्यामुळे नवे वाद निर्माण होतात.अशातच कॅब ड्रायव्हरची एक नियमावली सोशल मीडियावर व्हायरल होतो. मात्र या यादीमुळे सोशल मीडियावरील नव्या वादाला तोंड फुटले आहे. काही लोकांनी या नियमावलीला सहमती दर्शवली तर काहींनी याला ही नियमावली म्हणजे कॅब ड्रायव्हरची दादागिरी असल्याचे म्हंटले आहे.

दरम्यान, Your_Friendly_Panda नावाच्या एका Reddit वापरकर्त्याने कॅब ड्रायव्हरच्या या नियमावलीचा फोटो शेअर केला आहे. यासोबतच त्याने आपला अनुभव देखील शेअर केला आहे. जेव्हा मी कॅब बुक केली तेव्हा ड्रायव्हरने पुढच्या सीटच्या मागे हेड रेस्टवर नियमांची यादी चिकटवली होती. ज्यामध्ये कॅब ड्रायव्हरने प्रवाशांसाठी काही मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत. या नियमावलीचा फोटो त्या प्रवाशाने सोशल मीडियावर शेअर केला आहे.  मात्र हा कॅब ड्रायव्हर कोणत्या भागातील आहे याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.

कॅब ड्रायव्हरची नियम-
1. तुम्ही कॅबचे मालक नाही.
2. कॅब चालवणारा चालक हा कॅबचा ड्रायव्हर आहे.
3.चालकाशी नम्रपणे बोला आणि इज्जत कमवा.
4. कॅबचे दार दोरात बंद करू नका.
5. तुम्ही आम्हाला मीटर व्यतिरिक्त पैसे देत नाही, त्यामुळे आमच्याशी बोलताना गर्व, अहंकार बाळगू नका.
6. आम्हाला भैया म्हणू नका
NOTE- वेळेत पोहोचण्यासाठी गाडीचा वेग वाढवण्यास सांगू नका.

कॅब ड्रायव्हरच्या गुंडगिरीच्या वर्तनाबद्दल लोकांमध्ये Reddit अॅप वर वाद सुरू झाला आहे. एका युजरने कमेंट केली की, दरवाजा हळू बंद करणं समजतं, पण Attitude मध्ये राहा ही कोणती भाषा झाली. तर दुसऱ्या युजरने जोपर्यंत हे कॅब चालक आदरीने वागेल तोपर्यंतच आम्ही वागू. पण जर कॅब ड्रायव्हरने मुजोरी केली तर आम्ही पण एकणार नाही असे म्हंटले आहे.