केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांमध्ये वाढ

62

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीअंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांना आज मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. यावेळी ३४ दुरुस्त्या करून बदल करण्यात आले. या मंजुरींचा लाभ ४८ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना होणार आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (डीए) ५० टक्के करण्यात आला आहे. घरभाडे भत्ता शहरांच्या दर्जानुसार एक्स, वाय आणि झेड निकषानुसार देण्यात येईल. ३० टक्के, २० टक्के आणि १० टक्के असा घरभाडे भत्ता असेल. त्यामुळे घरभाडे भत्ता शहरांच्या दर्जानुसार किमान ५४००, ३६०० आणि १८०० रुपये देण्यात येणार आहे. घरभाडे भत्ता आणि अन्य भत्त्यांचे सुधारित दर १ जुलैपासून लागू होणार असून ३४ लाख केंद्रीय कर्मचारी, निवृत्तीवेतनधारक आणि १४ लाख लष्करातील जवान आणि कर्मचाऱ्यांना होणार आहे. या सुधारित भत्त्यांमुळे केंद्र सरकारच्या तिजोरीवर ३० हजार ७४८ कोटींचा बोजा पडणार आहे.
ठळक वैशिष्ट्य़े
– निवृत्तीवेतनधारकांना सध्या ५०० रुपयांचा मेडिकल अलाऊन्स दिला जात होता. १ जुलैपासून एक हजार रुपये दिला जाईल.
– अपंगांसाठी निवृत्तीभत्ता ४५०० वरून ६७५० रुपये.
– नर्सिंगभत्ता ४८०० वरून ७२०० रुपये.
– ओव्हर टाइम भत्ता ३६० वरून ५४० रुपये.
– हॉस्पिटल केअर भत्ता २०७०-२१०० वरून ४१००-५३०० असा वाढविला आहे.
– नक्षल भागात तैनात असलेल्या सीआरपीएफ जवानांच्या भत्त्यांमध्ये ८४००-१६,८०० वरून प्रतिमहिने १७,३००-२५००० हजार रुपये करण्यात आला आहे.
– सियाचीनमध्ये तैनात असलेल्या जवानांचा भत्ता १४ हजारांवरून ३० हजार तर अधिकाऱ्यांचा २१ हजारांवरून ४८,५०० रुपये केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या