24 व्या आठवड्यात गर्भपात करू शकतात महिला, कॅबिनेटची मंजूरी

756

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेटने मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नेंसी सुधारणा विधेयकाला मंजूरी दिली आहे. यामुळे आता गर्भवती महिला 24 व्या आठवड्यात म्हणजेच सहाव्या महिन्यांपर्यंत गर्भपात करू शकतात. येत्या संसदेच्या अधिवेशनात हे बिल दोन्ही सभागृहांमध्ये सादर केले जाणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली आहे.

सध्या कायदेशीररित्या 20 आठवड्यांपर्यंतच गर्भपात करण्याची परवानगी आहे. मात्र यात बदल करून 20 आठवड्याऐवजी 24 ते 26आठवड्यातही गर्भपात करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली जात होती. याबाबत एक जनहित याचिका देखील सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. ‘सरकारच्या या निर्णयाचा फायदा बलात्कारातून गर्भवती राहिलेल्या तरुणींना व अल्पवयीन मुलींना होऊ शकतो’, असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या