विधिमंडळातील मुख्य प्रतोदांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा

81

सामना प्रतिनिधी । नागपूर

राज्य सरकारने विधिमंडळातील दोन्ही सभागृहांच्या पक्षाच्या मुख्य प्रतोदांना राजशिष्टाचारानुसार कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा दिला आहे. तर प्रतोदांना राज्यमंत्र्यांचा दर्जा मिळाला आहे. यामध्ये विधान परिषदेतील शिवसेनेच्या मुख्य प्रतोद डॉ. नीलम गोऱ्हे, भाजपचे भाई गिरकर तर विधान सभेतील शिवसेनेचे सुनील प्रभू आणि भाजपचे राज पुरोहित यांना समावेश आहे. राज्य सरकारने विधान परिषद आणि विधानसभेतील सत्ताधारी पक्षाच्या प्रतोदांना मुख्य प्रतोद असे संबोधण्यात येऊन त्यांना मंत्रीपदाचा दर्जा दिला. तर इतर पक्षांच्या एकूण सदस्य संख्येच्या १० टक्के संख्या असणाऱ्या पक्षांचे प्रत्येकी एक प्रतोद यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. त्यांना राजशिष्टाचारानुसार राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या