ड्रॅसेलची सुवर्ण सप्तमी : जागतिक जलतरण स्पर्धा

27

सामना ऑनलाईन, बुडापेस्ट

अमेरिकेचा नव्या दमाचा जलतरणपटू सेलेब ड्रसेल याने महान जलतरणपटू मायकल फेल्प्सचा एकाच स्पर्धेत सात सुवर्णपदके जिंकण्याच्या जागतिक विक्रमाची बरोबरी केली. २० वर्षीय ड्रसेलने १७व्या जागतिक जलतरण अजिंक्यपद स्पर्धेत हा पराक्रम केला.

स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी ड्रसेलने डूना एरेनामध्ये ४ बाय १०० मीटर मेडले रिलेच्या बटरफ्लायमध्ये जबरदस्त कामगिरी करीत अमेरिकेला सुवर्णपदक जिंकून दिले. स्पर्धेतील हे त्याचे सातवे सुवर्णपदक ठरले. फेल्प्सने २००७मध्ये जागतिक जलतरण स्पर्धेत सात सुवर्णपदकांची कमाई केली होती. ड्रसेलच्या सोनेरी कामगिरीच्या जोरावर अमेरिकेने या स्पर्धेत एकूण ३८ पदकांची कमाई केली. जागतिक जलतरण स्पर्धेच्या इतिहासातील ही सर्वोत्तम कामगिरी होय.

‘फेल्प्ससारख्या महान जलतरणपटूंच्या विक्रमाशी बरोबरी करणे ही नक्कीच भूषणावह बाब होय. तब्बल १२ वर्षांनंतर फेल्प्सच्या विक्रमाशी बरोबरी केल्यानंतर काय बोलायला पाहिजे, हे मला समजत नाही. आता युरोपमध्ये जाऊन काही दिवस आराम करणार. त्यानंतर पोलंड आणि स्कॉटलंडमध्ये थोडी मौजमस्ती करणार. मागील आठ दिवस स्पर्धेत खेळाचा भरपूर आनंद लुटला, एवढेच मला म्हणावे वाटते.’ – सेलेब ड्रसेल

 

आपली प्रतिक्रिया द्या