ठाणे महापालिकेचा फंडा; इलेक्ट्रिक गाडी घेतली तर चार्जिंग ‘फुकट’

80

सामना प्रतिनिधी । ठाणे

स्मार्ट सिटीच्या दिशेने झेपावणाऱ्या ठाणे महापालिकेने प्रदूषणमुक्त वाहतूक व्यवस्था उभारण्याची तयारी सुरू केली आहे. परिवहनच्या ताफ्यात ई-बसेस घेण्यासोबतच ठाणेकरांनाही या मोहिमेत सहभागी करण्यासाठी इलेक्ट्रिक गाडी घेतली तर पहिल्या वर्षी चार्जिंग फुकट देण्याचा विचार प्रशासन करत आहे. महापालिकेच्या या अनोख्या फंडानुसार पालिकेच्या चार्जिंग स्टेशनवर पहिल्या वर्षी शंभर टक्के, दुसऱ्या वर्षी पन्नास टक्के, तर तिसऱ्या वर्षी पंचवीस टक्के वीजबिलात सवलत ठाणेकरांना मिळू शकते. या संदर्भाचा प्रस्ताव लवकरच तयार करण्यात येणार असून मंजुरीसाठी तो महासभेत ठेवण्यात येणार आहे.

ठाणे महापालिकेच्या ताफ्यात लवकरच शंभर ई-बसेस दाखल होणार आहेत. या बसेससाठी आनंदनगर जकात नाका येथे चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम सुरू आहे. ई-बसेसची चाचणी सुरू असून ती पूर्ण होताच शहरातील रस्त्यांवर त्या धावणार आहेत. हा उपक्रम राबवत असतानाच आणखीन एक पाऊल पुढे टाकत महापालिकेने शहरात खासगी ई-वाहतुकीला प्रोत्साहन देण्याचे ठरवले आहे. शहरात इलेक्ट्रिकल काहनांचा कापर काढकिण्याच्या दृष्टीने किकिध ठिकाणी चार्जिंग स्टेशनची उभारणी करणे क त्यासाठी किकिध पर्यायांची चर्चा करण्यासाठी नागरी संशोधन केंद्र येथे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीत विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संजीव जयस्वाल यांनी जास्तीत जास्त नागरिकांनी इलेक्ट्रिकल वाहनांचा वापर करावा यासाठी पहिल्या वर्षी चार्जिंगसाठी शंभर टक्के सवलत, दुसऱ्या वर्षी ५० टक्के आणि तिसऱ्या वर्षी २५ टक्के सवलत देता येईल का यावरही विचार करता येईल असे सांगितले.

लवकरच मुहूर्त
येत्या काही महिन्यात हा प्रकल्प कार्यान्वित करण्याचा मानस असल्याचे जयस्वाल यांनी सांगितले. त्यासाठी जनजागृती अभियानही राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या प्रचार आणि प्रसारासाठी आकर्षक योजना राबविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या