केकची डिलिव्हरी करणाऱ्या तरुणाचा 66 महिलांवर बलात्कार

प्रातिनिधिक फोटो

केकची डिलिव्हरी करणाऱ्या एका तरुणाने 66 महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर बलात्कार केल्याचं वृत्त आहे. ही घटना पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यातील आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, विशाल शर्मा असं या तरुणाचं नाव आहे. विशाल एका नामांकित केक कंपनीत डिलिव्हरी बॉयचं काम करतो. तो केक ऑर्डर करणाऱ्या महिलांना केकविषयी फीडबॅक देण्यासाठी व्हिडीओ कॉल करायचा.

या व्हिडीओ कॉलदरम्यान तो महिलांचे आक्षेपार्ह फोटो काढत असे तसंच कॉल रेकॉर्डही करत होता. मग त्या महिलांना फोटो आणि कॉलच्या बळावर ब्लॅकमेल करत होता. ब्लॅकमेल करून तो त्यांच्यावर बलात्कार करत असे.

अशा प्रकारे त्याने 66 महिलांवर बलात्कार केला आहे. गंभीर म्हणजे त्याच्या आईलाही त्याच्या या कृत्याची कल्पना होती, तसंच तिनेही या सगळ्यात त्याची साथ दिल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणी विशाल शर्मा तसंच त्याची आई सुमन मंडल या दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या