कोलकाता येथे प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्येचा निषेध म्हणून देशभरात एनडीए सरकारविरोधातील रोष वाढत असून डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी ठोस कायदा तयार करण्याची मागणी होत आहे. आंदोलन दिवसेंदिवस पेटतच चालले आहे. मात्र भाजपने पश्चिम बंगालच्या सरकार आरोप करत आज बंद पुकारला आहे. या विरोधात एका याचिकाकर्त्यानं कोलकाता उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र त्याची याचिका फेटाळून लावत भाजपने पुकारलेला बंद वैध ठरवला आहे.
कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती टी एस शिवग्ननम आणि न्यायमूर्ती हिरणमय भट्टाच्चार्या यांनी भाजपने पुकारलेला बंद बेकायदेशीर घोषित करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली. तसेच याचिकाकर्त्याला प्रकरणात स्वत:बद्दल खोटी माहिती दिल्याबद्दल न्यायालयात आणखी कोणतीही जनहित याचिका दाखल करण्यास मनाई करण्यात आली आहे.