पाकिस्तानला दहा दिवसांत धूळ चारू

954

हिंदुस्थानकडून तीन-तीन युद्धे हारलो आहोत हे शेजारी देशाला चांगलेच माहीत आहे. त्यामुळे हा शेजारी देश छुपे युद्ध करत आहे. परंतु शेजारी देशाला धूळ चारण्यासाठी हिंदुस्थानी लष्कराला फक्त 10 ते 12 दिवस लागतील हे लक्षात ठेवावे, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दिला आहे.

दिल्लीत ‘एनसीसी’ कॅडेट्सना संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी नाव न घेता पाकिस्तानचा उल्लेख ‘शेजारी देश’ असा केला. थेट युद्धात जिंकता येणार नाही, यामुळे शेजारील देश हिंदुस्थानविरोधात छुपे युद्ध करीत आहे. या छुप्या युद्धात आजपर्यंत आपले अनेक जवान शहीद झाले, अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला. हिंदुस्थानी लष्कराला शेजारी देशाला धूळ चारण्यासाठी फक्त 10 ते 12 दिवस लागतील हे लक्षात ठेवावे, असे पंतप्रधानांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या