महापालिकेची नालेसफाई जोरात

24

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबई महानगरपालिकेद्वारे पाकसाळ्यापूर्वी करण्यात येणारी नालेसफाईची कामे वेगात सुरू असून मेअखेर मोठ्या नाल्यांच्या सफाईची कामे ७८.४७ टक्के पूर्ण झाली आहेत. गेल्या वर्षी हेच प्रमाण ५९.२८ टक्के एवढे होते. छोट्या नाल्यांच्या सफाईची कामेही वेळापत्रकानुसार सुरू असून ही सर्व कामे पावसाळ्यापूर्वी निश्चित पूर्ण होतील, असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रातील मोठ्या नाल्यांच्या सफाईतून सुमारे १ लाख ७७ हजार ७६६ मेट्रिक टन गाळ पावसाळ्यापूर्की हटविणे अपेक्षित आहे. यापैकी २० मे २०१७पर्यंत सुमारे १ लाख ३९ हजार ४८५ टन गाळ काढून व वाहून नेण्यात आला आहे. तर २० मेपर्यंत नालेसफाईची कामे ७८.४७ टक्के एवढी झाली आहेत. गेल्या कर्षी पावसाळ्यापूर्वी एकूण १ लाख ७७ हजार ८१८ मेट्रिक टन एवढा गाळ काढून व वाहून न्यायचा होता. यापैकी गेल्या वर्षी मेच्या तिसऱ्या आठवड्याच्या अखेरपर्यंत मोठ्या नाल्यांमधून सुमारे १ लाख ५ हजार ४०३ मेट्रिक टन एवढा गाळ काढून व वाहून नेण्यात आला होता. म्हणजेच गेल्या वर्षी हे प्रमाण ५९.२८ टक्के असल्याची माहिती अभियांत्रिकी सेवा व प्रकल्पांचे प्रभारी संचालक प्रकाश कदम यांनी दिली.

अतिरिक्त मनुष्यबळ देणार
छोटे नाले व रस्त्यालगतच्या वाहिन्यांच्या सफाईची कामे विभाग स्तरावर केली जात असून ती स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने केली जात आहेत. ही कामे करताना गरज भासल्यास स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या