जेईई, नीटची परीक्षा रद्द करा! 11 राज्यांतील विद्यार्थी सर्वोच्च न्यायालयात

234

कोरोनामुळे सर्व परीक्षा स्थगित किंवा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जेईई व नीटची प्रवेशपरीक्षाही स्थगित करण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका 11 राज्यांतील विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. परिस्थिती सामान्य झाल्यानंतर या परिक्षा घेण्यात याव्यात असे या याचिकेत म्हटले आहे.

कोरोनामुळे एप्रिलमध्ये होणारी जेईई मुख्य परीक्षा सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. आता ही परीक्षा 1 ते 6 सप्टेंबर या कालावधीत घेण्यात येणार आहे. तर नीटची परीक्षा 13 सप्टेंबर रोजी होणार आहे. देशभरातील सर्व प्रकारच्या परीक्षा एकतर रद्द करण्यात आल्या आहेत किंवा स्थगित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नीट व जेईईची प्रवेश परीक्षाही रद्द करण्यात यावी अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. याच मागणीसाठी 11 राज्यांतील विद्यार्थ्यांच्या वतीने ऍड. अलख आलोक श्रीवास्तव यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

अशा आहेत मागण्या

  • कोरोनाचे संकट संपल्यानंतर प्रवेश परीक्षा घेण्यात यावी.
  • प्रत्येक जिह्यात परीक्षा केंद्र असावे.
  • नव्याने अर्ज करण्याची तसेच परीक्षा केंद्र निवडण्याची मुभा द्यावी.
आपली प्रतिक्रिया द्या