जिद्दीने लढून कर्करोगाला हरवेन! संजय दत्तचा व्हिडीओ व्हायरल

फुप्फुसाच्या कर्करोगाशी झुंज देणाऱया बॉलिवूड अभिनेता संजय दत्तचा एक व्हिडियो सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. यात पहिल्यांदाच त्याने आपल्या आजारपणाबाबत प्रतिक्रिया दिली असून ‘कर्करोगाशी जिद्दीने लढेन आणि त्यावर मात करेन’ असे संजूबाबाने म्हटले आहे.

हेयर स्टायलिश आलिम हकीम यांनी हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेयर केला आहे. संजूबाबा व्हिडीओमध्ये म्हणाला, ‘सलूनमध्ये परतल्यावर मला खूप छान वाटत आहे. मी नवीन हेयरस्टाईल केली आहे. आपण पाहत असाल तर ही माझ्या जीवनातील अलीकडील खूण आहे. परंतू मी कर्करोगावर नक्कीच मात करेन.’ आजारपणात देखील संजय दत्त आपले काम थांबवलेले नाही.

व्हिडीमध्ये आपल्या कामाविषयी माहिती देताना तो म्हणाला, ‘केजीएफ 2 साठी मी आता दाढी वाढवत आहे. 1 नोव्हेंबरपासून त्याचे शूटिंग करणार आहे. सेटवर परतल्यामुळे आनंद होत आहे. उद्या मी शमशेरासाठी डबिंग करतोय. तिथेही खूप मजा येईल.’

आपली प्रतिक्रिया द्या