कॅन्सरशी झुंजणाऱ्या 100 वर्षांच्या आजींची कोरोनाला धोबीपछाड!

463

कॅन्सरशी झुंजणाऱ्या एका 100 वर्षांच्या आजींनी कोरोनावरही मात केली आहे. मध्य प्रदेशच्या खरगोन येथे या आजी राहतात. रुक्मिणी चौहान असं या आजींचं नाव आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, खरगोन जिल्ह्यातील बडवाह येथे रुक्मिणी चौहान राहतात. त्यांना अंडाशयाचा कर्करोग आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून त्या अंथरुणाला खिळून आहेत. दोन आठवड्यांपूर्वी त्यांना कोरोना झाल्याचं निदान झालं होतं. पण त्यांच्यात कोणतीही लक्षणं दिसत नव्हती. त्यामुळे आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरातच उपचार करण्याचा निर्णय घेतला.

14 दिवसांमध्ये त्यांच्यावर घरातच उपचार केले गेले. त्यांचे तापमान, शरीरातील ऑक्सिजन पातळी आणि कोविडवरील औषधे, आयुर्वेदिक काढे असा सर्वप्रकारे उपचार करण्यात आला. आणि 14 दिवसांनी त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. त्यांची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना आनंद झाला आहे. रुक्मिणी चौहान यांचा समावेश आता देशातील सर्वात वयोवृद्ध कोरोनाग्रस्तांमध्ये झाला आहे, ज्यांनी कोरोनावर मात केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या