कोरोनामुळं पत्नीचं चुंबनही घेऊ शकलो नाही, माजी मुख्यमंत्र्यांच्या विधानाने हास्याची खसखस पिकली

कोरोनाचा प्रभाव हळूहळू कमी होताना दिसत असून देशात लसीकरणालाही सुरुवात झाली आहे. यामुळे सोशल डिस्टन्स आणि कोरोनाचे नियम पाळून नागरिक घराबाहेर पडायला सुरुवात झाली आहे. कट्ट्याकट्ट्यावर कोरोनाच्या सुरुवातीच्या काळातील किस्से ऐकायला मिळत आहेत. याला नॅशनल काँन्फरंसचे अध्यक्ष आणि जम्मू-कश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्लाही अपवाद नाहीत.

रविवारी एका पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात बोलताना फारूख अब्दुल्ला यांनी केलेल्या एका विधानामुळे उपस्थितांमध्ये हास्याची खसखस पिकली. कोरोना महामारीच्या काळात पत्नीच्या जवळही जाता आले नाही आणि तिचे चुंबनही घेतला आले नाही, असे विधान 83 वर्षीय अब्दुल्ला यांनी केले आणि उपस्थितांमध्ये एकच हास्यकल्लोळ उडाला.

फारूख अब्दुल्ला पुढे म्हणाले की, कोरोनामुळे आता अशी परिस्थिती आहे की लोक हात मिळवायला आणि गळाभेट घ्यायलाही घाबरत आहेत. एवढेच नाही तर इच्छा असूनही मी पत्नीचे चुंबनही घेऊ शकत नाही आणि गळाभेटीचा तर सवालच नाही. तसेच मी योग्य तेच करत आहे, असेही ते म्हणाले. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या महिलांपासून वाचवा…

फारूख अब्दुल्ला यांचा मजेशीर अंदाज याआधीही पाहायला मिळाला आहे. 27 मार्च, 2018 ला संसद भवनामध्ये त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. यादरम्यान दोन महिला पत्रकार बुम घेऊन तिथे पोहोचल्या. त्यावेळी त्यांनी या महिलांपासून कोणीतरी वाचवा असे म्हटले होते आणि उपस्थितांमध्ये हास्याचे कारंडे उडाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या