मकर

2174

“माणूस शक्तिमान व बुद्धिमान असल्यास इतर माणसे त्याला वश होतात व तो जर कमी शक्तिमान व निर्बुद्ध असेल तर ते त्याचे शत्रू बनतात.’’

यश व अपयश या मार्गातून तुमची वाटचाल सुरू आहे. तुमचा स्वतःचा वेग, कामाचा वेग फार मोठा असतो; परंतु त्याला वेसण घातली आहे ग्रहांनी. आता चिंता कमी होईल. नवी दिशा व नवा विचार दिवाळी तुम्हाला देणार आहे. संघर्ष आहे. क्षेत्र कोणतेही असो यश खेचून आणता येईल ते प्रयत्नाने. दिवाळीचे सर्व दिवस तुमच्या उत्साहाचे असतील. तुमच्या दैवताचे स्मरण हेच तुमच्या प्रगतीचे वैभव ठरू शकेल. नवा आरंभ दिवाळीत होईल. भाऊबीजेला शुभ संकेत मिळेल. वर्षभर कन्या राशीत म्हणजे मकरेच्या भाग्य स्थानात? वास्तव्य करणार आहे. तुमचे जटिल प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. २६ जानेवारी २०१७ला शनि धनु राशीत म्हणजे मकरेच्या व्ययस्थानात प्रवेश करीत आहे. मकर राशीला साडेसाती २६ जाने.ला सुरू होत आहे. २० जून ते २५ ऑक्टोबरला शनि वक्री होऊन वृश्चिकेत येत आहे. २६ ऑक्टोबर २०१७ शनि मार्गी होऊन धनु राशीत आहे. १८ ऑगस्ट २०१७ राहू कर्क राशीत म्हणजे मकरेच्या सप्तम स्थानात व केतु (मकर राशीत) स्वराशीत प्रवेश करीत आहे. १२ सप्टें. २०१७ ला गुरू तुला राशीत प्रवेश करीत आहे. समस्या येतील त्यावर मार्ग मिळेल. कौटुंबिक सुखात अडचणी येतील. जीवनसाथीच्या कडील चिंता वाढेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत विरोधकांना शह देऊन काम करावे लागेल. ‘एक घाव दोन तुकडे’ हा विचार करण्याची वेळ तुमच्यावर येऊ शकते. संयमाने कृती करा. शक्य तेच करा. भलतेच आश्वासन देऊन स्वतः अडचणीत येऊ नका. स्वतःच्या असो किंवा दुसऱयाच्या चुका समजून घ्या व त्यावर उत्तर शोधा. जून ते ऑक्टोबर कालावधी तुमच्या यशोगाथेचा ठरेल. तुमच्या क्षेत्रात तुमचा मोठा भाग्योदय होऊ शकतो. न झालेले काम होईल. पुढील भविष्याचे विवेचन पुढे पाहूया.

राजकीय-सामाजिक क्षेत्र:

राजकीय-सामाजिक क्षेत्रांत व्यापक स्वरूपात कार्य होईल. तुमच्या योजना मार्गी लागतील. दौऱयात यश व लोकप्रियता मिळेल. महिला, मुले, अपंग यांच्यासाठी विशेष स्वरूपाचे कार्य होऊ शकेल. आर्थिक मदत मिळेल. वरिष्ठ सहकार्य देतील.

२६ जानेवारी ते २० जून शनिची साडेसाती असेल. डिसेंबर, जानेवारी, मे व जूनमध्ये आरोप होतील. टीका होईल. तुम्हाला एखाद्या प्रकरणाचा मनस्ताप होईल. अपमानास्पद वागणूक सहन करावी लागेल. गुप्तशत्रूंना मात्र कमी लेखू नका. सावध रहा. ऑक्टोबर, मार्च व मेमध्ये प्रवासात सावध रहा. कोर्टकचेरीच्या कामात अडचणी येतील. संताप वाढेल. संघर्षातून तुमच्या यशाला दिशा मिळेल. फेब्रुवारी, मार्च, एप्रिलमध्ये मान-सन्मानाचा योग येईल. मेमध्ये विशेष यश मिळेल. जुलैमध्ये महिला वर्गाच्या सहयोगाने कार्य होईल.

नोकरी-व्यवसाय:

शेतकरी वर्गाच्या समस्या कमी होतील. खरेदी-विक्रीत ऑक्टोबर, नोव्हेंबर, फेब्रुवारी, मार्चमध्ये फायदा होईल. नव्या पद्धतीने शेतीची उन्नती करू शकाल. नोकरीत चांगली प्रगती या वर्षात होईल. परदेशी जाण्याचा योग येईल. तुमचे प्रोजेक्ट प्रसिद्धीला येतील. साडेसातीत माणूस अधिक अनुभवी होतो. विविध प्रकारची माणसे भेटतात व विविध प्रसंगाला सामोरे जावे लागते. मकर रास शनिची आहे त्यामुळे त्यांना कमी त्रास होतो. नेहमीच मर्यादेत राहिलेल्या माणसाला परिणामांची कल्पना असते. डिसेंबर, जानेवारी, जून व ऑगस्टमध्ये व्यवसायाला चांगली कलाटणी मिळेल. थोरामोठय़ांच्या ओळखी होतील. परदेशात व्यवसाय वाढू शकतो. कायद्याच्या बाबतीत सावध रहा.

विद्यार्थी-तरुणवर्ग:

मागील वर्षात घेतलेल्या अभ्यासातील कष्टांमुळे या वर्षातसुद्धा भव्यदिव्य यश तुम्हाला मिळेल. डिसेंबर, जानेवारी व जूनच्या परीक्षेसाठी जास्त मेहनत करा. वाद वाढवू नका. ऑक्टोबर-मेमध्ये वाहनापासून धोका होऊ शकतो. ऑगस्टमध्ये खाण्याची काळजी घ्या. तुम्ही सध्या कुणावर विश्वास ठेवत नाही. परंतु गोड बोलण्याऱया व्यक्तीपासून धोका राहील. जुलैमध्ये प्रेमात तणाव होईल. या वर्षात तुमचा आत्मविश्वास व उत्साह वाढणार आहे. तुमच्या क्षेत्रात अधिक चांगली उन्नती तुम्ही करू शकाल.

महिलावर्ग:

स्पष्ट बोलणे कधी कधी तुम्हाला त्रासदायक ठरते. तुम्ही मेहनती आहात. सर्वांची काळजी घेणारा तुमचा स्वभाव आहे. मुलांचे अतिलाड तुम्ही करता. कौटुंबिक सुखात या वर्षात भर पडेल. वृद्ध व्यक्तींची चिंता असेल. संततीच्या प्रगतीची बातमी मिळेल. नवीन घर, वाहन इ. खरेदी होईल. ऑक्टोबरमध्ये मनावर दडपण येईल आणि मेमध्ये शेजारी, आप्तेष्ट यांच्यात तणाव होईल. ऑगस्टमध्ये प्रकृतीची काळजी वाटेल. ऑपरेशनची शक्यता. या वर्षात तुमच्या क्षेत्रात तुम्ही नव्या वाटेने वाटचाल मात्र कराल.

आपली प्रतिक्रिया द्या