कार्तिक आर्यन बनला पायलट!

अभिनेता कार्तिक आर्यन याने एक पोस्टर शेअर करत आज आपल्या आगामी कॅप्टन इंडिया चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाची कथा देशाच्या सर्वात मोठय़ा आणि यशस्वी बचाव मोहिमेवर आधारित आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते हंसल मेहता दिग्दर्शित आणि रोनी स्क्रूवाला व हरमन बावेजाद्वारे निर्मित हा एक्शन-ड्रामा आहे. यात कार्तिक आर्यन एका शूर आणि साहसी पायलटच्या भूमिकेत दिसणार आहे.

याविषयी कार्तिक आर्यन म्हणाला, ‘कॅप्टन इंडिया’ प्रेरणादायक आणि रोमांचकारी चित्रपट आहे. यानिमित्ताने मला आपल्या देशाच्या अशा एका ऐतिहासिक अध्यायाचा भाग बनता आले, हा माझा सन्मान आहे. हंसल सरांच्या कामाबद्दल मला खूप आदर असून त्यांच्यासोबत काम करण्यासाठीची ही योग्य संधी आहे.’’

तर हंसल मेहता म्हणाले, ‘‘कॅप्टन इंडिया’ सत्य घटनेपासून प्रेरित असून एका अशा घटनेला चित्रित करण्यात येणार आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती आपले दु:ख आणि वेदना बाजूला सारून हजारों लोकांचे प्राण वाचवतो. मी कार्तिकसोबत काम करण्यासाठी उत्साहित आहे.’’ ‘कॅप्टन इंडिया’चे चित्रीकरण पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला सुरू होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या