‘धोनीमुळेच मी टीम इंडियाचा कर्णधार बनू शकलो’, विराट कोहलीने व्यक्त केली भावना

656

लॉकडाऊनमध्ये संपूर्ण खेळ जगत ठप्प झालं आहे. अशातच अनेक खेळाडू सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत आहेत. टीम इंडियाचा गोलंदाज रविचंद्रन अश्विन याच्यासोबत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने इन्स्टाग्राम लाईव्ह चाट केली आहे. या चाट दरम्यान त्याने क्रिकेट आणि क्रिकेटच्या बाहेरच्या अनेक रंजक गोष्टी सांगितल्या आहेत. यावेळी बोलताना विराट कोहलीने हिंदुस्थानी संघाचा कर्णधार बनण्याचे श्रेय महेंद्रसिंह धोनी याला दिले आहे. विराट म्हणाला की, ‘एका रात्रीत कोणीही कर्णधार बनत नाही. याचीही एक प्रक्रिया आहे. कर्णधार म्हणून मला घडवण्यात माहीचा मोठा हात आहे.’

या लाईव्ह चाट दरम्यान अश्विनने विराटला कर्णधार होण्याविषयी प्रश्न विचारला. विराटने याच श्रेय धोनीला दिलं आणि म्हणाला, ‘मला हिंदुस्थानी संघाचं कर्णधारपद मिळण्यात माहीचा मोठा हात आहे. मी नेहमीच जबाबदाऱ्या स्वीकारण्यास तयार असतो. मात्र टीम इंडियाचा कर्णधार होण्याचे मी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता. हिंदुस्थानी संघात जागा पदार्पण केल्यानंतर मी फक्त टीम इंडियाकडून सतत खेळत राहू आणि नेहमीच प्लेयिंगइलेव्हन मी असावे, असं मला वाटायचं.’

तो पुढे म्हणाला की, ‘संघात मी माझे पक्के स्थान निर्माण केल्यानंतर मी कर्णधाराशी नियमितपणे बोलू लागलो. मी नेहमीच त्याच्या कानाजवळ असायचो, त्याच्याशी वेगवेगळ्या रणनीतींवर बोलायचो. मला वाटते की यामुळे मी ही जबाबदारी पार पडू शकेन, असा विश्वास त्याला माझ्या प्रति निर्माण झाला. एका कर्णधाराचा दुसर्‍या कर्णधारात बदल होणे, ही एका रात्रीत घडणारी गोष्ट नाही. आपल्याला हा विश्वास निर्माण करावा लागतो. आपण जबाबदारी सांभाळू शकता. हे सिद्ध करावे लागते. मला वाटत की यात धोनीची भूमिका खूप महत्वाची आहे.’ असं तो म्हणाला आहे.


View this post on Instagram

Wow what a finale on #reminiscewithash . Must watch guys

A post shared by Stay Indoors India (@rashwin99) on

आपली प्रतिक्रिया द्या