कसारा घाटात कार दरीत कोसळली, १ ठार; ४ गंभीर

39

सामना प्रतिनिधी । इगतपुरी

मुंबई-आग्रा महामार्गावरील कसारा घाटात घाटनदेवी मंदीरासमोरील उंट दरीत कार कोसळून अपघात झाला. या घटनेत १ मुलगी ठार, तर ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. वैष्णवी हरीष कटकीया (१५) असे ठार झालेल्या मुलीचे नाव आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार, मुंबई आग्रा महामार्गावर कसारा घाटाच्या सुरुवातीला असलेल्या घाटनदेवी मंदीरासमोरील उंटदरीच्या जवळ काही पर्यटक उंट दरीत पडणाऱ्या पाण्याचा आनंद घेत होते. यावेळी नाशिकवरून आलेल्या कारचालक कार मागे घेत असताना उंटदरीत ७०० फुट खाली कोसळली. कारमध्ये बसलेल्या कुटुंबातील मुलीचा जागीच मृत्यू झाला. वैष्णवी हरीष कटकीया (१५) असे ठार झालेल्या मुलीचे नाव आहे. तर हरीष गोपाल कटकीया (३९), त्यांची पत्नी गिताबाई हरीष कटकीया, मुलगी आदीती हरीष कटकीया (९) आणि मुलगा रुद्र हरीष कटकीया (७) वर्ष गंभीर जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती समजताच घोटी टोल प्लाझाचे कर्मचारी व घोटी टॅबचे सेक्युरिटी ऑफिसर विनय जाधव व कर्मचारी यांच्यासह महामार्ग पोलीस निरीक्षक सुभाष पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन कारला क्रेनच्या सहाय्याने दरीतुन बाहेर काढले. सर्व जखमींवर इगतपुरी ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचार करून जिल्हा रूग्णालयात हलवण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या