अकोला राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील चारजण ठार

सामना प्रतिनिधी। नागपूर

अकोला राष्ट्रीय महामार्गावरील नागझिरी फाट्याजवळ कारला अ‍ॅम्ब्युलन्सची धडक बसल्याने झालेल्या भीषण अपघातात चार ठार व पाच जण जखमी झाले आहेत. मृतांमधील सर्वजण एकाच कुटुंबातील आहेत. रविवारी हा अपघात घडला आहे.

रविवारी नागपूरच्या वाडी येथील रोकडे कुटुंबातील सात जण वॅगन आर कारने अमरावतीकडे येत होते. त्यावेळी समोरुन एमएच १४ सीएल-१८९३ क्रमांकाची रुग्णवाहिका अकोलामार्गे लोणीहून मानाकडे जात होती. अचानक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अ‍ॅम्ब्युलन्सची कारला धडक बसली. यात कारमधील रोकडे कुटुंबातील चौघे जागीच ठार झाले. मनीषा, रमेश (५०), बाबाराव, सोहम अशी मृतांची नावे आहेत. तर जखमींमध्ये कारमधील तिघांसह अ‍ॅम्ब्युलन्समधील डॉ. रवींद्र ठाकरे (२७), चालक महेंद्र यशवंत खाडे (४०) यांचा समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या