दुचाकी-कारच्या भीषण अपघातात पती-पत्नी ठार

सामना प्रतिनिधी । कोपरगाव

नांदगाव तालुक्यातील बंजारवाडी येथील जाधव पती-पत्नी यांचा मंगळवारी दुपारी दुचाकी अपघातात मृत्यू झाला. कोपरगाव संगमनेर मार्गावरील चांदेकसारे परिसरातील चव्हाण वस्ती जवळ कारने दिलेल्या जोराच्या धडकेत हे दोघे जागीच ठार झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार नांदगाव तालुक्यातील बंजारवाडी येथील संजय पुंडलीक जाधव (48) व संजीवनी संजय जाधव (44)  हे कोपरगाव संगमनेर रस्त्याने दुचाकी बजाज कंपनीची क्रमांक एम.एच.15 ए.एन. 3827 वरून येत असताना चांदेकसारे परिसरातील चव्हाण वस्ती नजीक पांढ-या रंगाच्या आय 20 एम.एच.17 ए.झेड 9407 कारने भरधाव वेगाने धडक दिली. यात दुचाकी वरील पती-पत्नी जागीच ठार झाले. कार चालक कार रस्त्यावर सोडून पळुन गेला. या प्रकरणी शांताराम विश्वनाथ डुबे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून कार चालक कारचालकाच्या विरोधात कलम 304 अ, 267,338,427 आणि मो.वा.का.क.134 अ,ब 184/177 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.