पहिल्यांदाच कार चालवायला शिकत आहात? या गोष्टी ठेवा लक्षात! 

3621

आजकाल सेकंड-हँड कारची मागणी वाढत चालली आहे. यामध्ये अनेक लोक असे आहेत जे पहिल्यांदाच कार चालवायला शिकण्यासाठी सेकंड-हँड कारचा वापर करतात. मुलगा असो वा मुलगी प्रत्येकाची इच्छा असते की आपल्याला चांगली ड्रायव्हिंग करता यायला हवी. आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही सहज गाडी चालवायला शिकू शकता. चला तर जाणून घेऊ काय आहे या टिप्स.

कारबद्दल अचूक माहिती घ्या: जर तुम्ही पहिल्यांदा कार चालवायला शिकत असाल तर आपण जे चारचाकी वाहन चालवायला शिकत आहात त्याची योग्य माहिती घ्या. यासाठी तुम्हाला स्टीअरिंग, गीअर, क्लच, ब्रेक, एक्सीलेटर आणि हँड ब्रेकची संपूर्ण माहिती घेतली पाहिजे, ही माहिती ड्राईव्ह दरम्यान तुम्हाला उपयुक्त ठरेल.

लक्ष देणे महत्वाचे आहे: ड्रायव्हिंग करताना, नेहमी लक्षात ठेवा की आपली एकाग्रता ड्रायव्हिंगवर असली पाहिजे. यासाठी दक्ष रहा. कारच्या डावी आणि उजवीकडील दोन्ही आरसे तुम्हाला दोन्ही बाजूंना पाहता येईल अशा पद्धतीने सेट करा.

वाहन चालवताना आपले मन शांत ठेवाः ड्रायव्हिंग करताना नेहमीच आपले लक्ष वाहन चालवण्यावर केंद्रित करणे महत्वाचे आहे आणि त्यासाठी शांत राहणे देखील खूप महत्वाचे आहे. जेव्हा मन शांत नसते तेव्हा अनेक जण गोंधळून जातात आणि ते ब्रेकऐवजी एक्सिलेटरवर पाय ठेवतात. ज्यामुळे त्यांना बर्‍याचदा अपघातांना सामोरे जावे लागते. म्हणूनच, जर तुम्ही शांत मनाने वाहन चालवत असाल तर तुम्ही चांगले वाहन चालवू शकाल.

रस्त्यावर योग्य अंतर ठेवून वाहन चालवा: जेव्हा तुम्ही वाहन चालवत असाल तेव्हा आपल्या आणि इतर वाहनमध्ये रस्त्यावर योग्य अंतर ठेवून गाडी चालवा. कारण बर्‍याच वेळा पुढे जाणारी गाडी अचानक ब्रेक मारते आणि ड्रायव्हिंगमध्ये नवीन असल्याने आपण कारला धडक देऊ शकता. तर हे लक्षात ठेवा आणि वाहन कमी वेगाने सुरक्षेच्या दृष्टीने अंतर ठेवून चालवा.

हे ही ठेवा लक्षात: बऱ्याचदा आपण नवीनच गाडी चालवायला शिकलेलो असल्यामुळे आपल्या रस्त्याच्या डावी किंवा उजवीकडे जात असताना सिग्नल द्यायचा असतो, हे माहित नसतं. आपण कोणताही सिग्नल न देता गाडी तशीच रस्त्याच्या डावी किंवा उजवीकडे वळवतो. यामुळे अपघात होऊ शकतो. लक्षात ठेवा रस्त्यावरून वाहन चालवत असताना रस्त्याच्या डावीकडे जायचे असल्यास डावीकडील इंडिकेटर आणि उजवीकडे जात असताना उजवीकडील इंडिकेटर सुरु करून मागच्या गाडीला सिग्नल द्या. तसेच आपण नुकतेच गाडी चालवायला शिकत असाल तर 40-50 या स्पीड दरम्यानच गाडी चालवा.

आपली प्रतिक्रिया द्या