लातुरातील उड्डाण पुलावर ‘द बर्निंग कार’चा थरार

41

सामना प्रतिनिधी । लातूर

शहरातील छत्रपती शिवाजी चौकातील उड्डाण पुलावर तवेरा जीप क्षणार्धात खाक झाली आहे. आगीची माहिती मिळाल्यावर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि कर्मचाऱ्यांनी आग विझवली. शॉर्ट सर्किट होऊन आग लागली अशी शंका व्यक्त केली जात असूने सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज उड्डाण पुलावर पांढऱ्या रंगाच्या धावत्या तवेरा ( एम एच २४ वाय ८४४४) गाडीला शनिवारी अचानक आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच सर्वजण गाडीतून बाहेर पडले. दरम्यान, ही दुर्घटना झाल्यानंतर बघ्यांची गर्दी झाली होती. अग्निशमन विभागाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळवले. काही काळासाठी मार्गावरील वाहतुकीत अडथळा निर्माण झाला होता.

आपली प्रतिक्रिया द्या