गाडी दरीत कोसळून आठ जणांचा मृत्यू, नंदुरबार येथील तोरणमाळ – सिंदिदिगर रस्त्यावरील घटना

नंदुरबार जिह्यातील तोरणमाळ – सिंदिदिगर रस्त्यावर प्रवासी वाहूतक करणारी बोलेरो गाडी दरीत कोसळून भीषण अपघात झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी घडली. या अपघातात आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला असून पंधराहून अधिक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. दरम्यान, बचावकार्य सुरू करण्यात आले असले तरी गाडी खोल दरीत कोसळल्याने अनेक अडचणी येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

नंदुरबार येथील तोरणमाळ-सिंदिदिगर या अतिदुर्गम भागात एका बोलेरो गाडीला भीषण अपघात झाला. प्रवासादरम्यान ही गाडी एका दरीत कोसळली. या अपघातात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे, तर मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. अवघ्या सहा महिन्यांत या रस्त्यावर हा दुसरा भीषण अपघात झाला आहे.

दरम्यान, स्थानिक पोलीस प्रशासनसुद्धा घटनास्थळी पोहोचले असून पोलिसांकडूनसुद्धा बचावकार्य केले जात आहे. ही घटना घडल्याचे समजताच पोलीस अधीक्षकांसह पोलिसांचा आणखी फौजफाटा घटनास्थळी रवाना झाला आहे. मात्र, हा भाग अतिदुर्गम असल्यामुळे येथे मोबाईलला नेटवर्क नाही. परिणामी बचावकार्य करण्यात मोठय़ा अडचणी येत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या