पॅथॉलॉजिस्ट व्हा!

38

पॅथोलॉजिस्ट ही वैद्यकीय शाखेतील महत्त्वाची शाखा आहे.आपण डॉक्टरांकडे गेल्यावर अचूक रोगनिदानासाठी पॅथॉलॉजी लॅबमध्ये पाठवले जाते. रक्त, थुंकी इत्यादींचे नमुने किंवा शस्त्रक्रियेनंतर अवयव तपासणीसाठी पॅथॉलॉजी लॅबोरेटरीमध्ये पाठवले जातात. अशा प्रकारच्या पॅथॉलॉजी लॅबमध्ये डॉक्टर पदवीधारक पॅथॉलॉजिस्टची आवश्यकता असते. डॉक्टर आणि पॅथॉलॉजिस्टमुळे रुग्णावर अचूक उपचार होतात. त्यामुळे पदवीधारक पॅथॉलॉजिस्टची आज आवश्यकता असते.

रुग्णावर उपचार चालू असताना त्याच्या शरीराने दिलेला प्रतिसाद योग्य आहे की उपचारात बदल करणे आवश्यक आहे, अशी सूचना देणारा डॉक्टर म्हणजे पॅथॉलॉजिस्ट (रोगनिदानतज्ञ). पॅथोलॉजी (शरीरविकृतीशास्त्र) हा आधुनिक वैद्यकशास्त्राचा एक भाग आहे. या विषयात पदव्युत्तर (एमडी) किंवा पदविका (डिप्लोमा) असे अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या डॉक्टरांना पॅथॉलॉजिस्ट म्हणतात. इलेक्ट्रोन मायक्रोस्कोप, इम्युनोहिस्टोकेमिस्ट्री, मोलिक्युलर बायोलॉजी या तंत्राचा उपयोग निदानासाठी केला जातो. काळाप्रमाणे पॅथॉलॉजिस्टनी करायच्या संशोधनाबाबत चाचण्यांची व्याप्ती वाढत आहे.

संधी
– रिसर्च सायण्टिस्ट, ब्लड बँक, वैद्यकीय महाविद्यालये आणि आपल्या परिसरातील लॅबमधून पॅथॉलॉजिस्ट रुग्णसेवा करू शकतात.
– योग्य रक्तदात्याची निवड करून योग्य रुग्णाला अनुरूप रक्त मिळणे ही पॅथॉलॉजिस्टची जबाबदारी असते.
– वेगवेगळ्या आजारांचा शरीरातील अवयवांवर होणारा परिणाम तपासणे. त्याचे पृथ्थकरण करून त्यांचा अभ्यास करणे. भविष्यात होणाऱ्या आजारांची माहिती शोधणे.
– क्लिनिकल पॅथॉलॉजी, हार्माथोलॉजी, हिस्टोपॅथोलॉजी, इम्युनोलॉजी, सेरोलॉजी इत्यादी पॅथॉलॉजी लॅबमध्ये होणाऱ्या तपासण्यांचे वर्गीकरण केलेले असते. आपल्या पदवीप्रमाणे आपल्याला त्या-त्या विभागात कामाची संधी असते.

अभ्यासक्रम
– मेडिकल मायक्रोबायोलॉजी, मेडिकल बायोकेमिस्ट्री यांचेही पदव्युत्तर अभ्यासक्रम करता येतात.
– क्लिनिकल पॅथॉलॉजी, हार्माथोलॉजी, हिस्टोपॅथोलॉजी, इम्युनोलॉजी, सेरोलॉजी असे काही पॅथोलॉजीतील उपविभाग आहेत. त्यानुसार पदवी मिळवण्याची संधी असते.

महाविद्यालये
– एमडी पॅथॉलॉजी, बॉम्बे हॉस्पिटल इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्स, मरीन लाईन्स, मुंबई
– एमडी पॅथॉलॉजी आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन क्लिनिकल पॅथॉलॉजी, डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, सेक्टर-७, नेरुळ
– पॅथॉलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंट, माझगाव

आपली प्रतिक्रिया द्या