हिंदुस्थानी नौदल

32

सामना ऑनलाईन । मुंबई

समुद्रातील आव्हानात्मक वातावरणात काम करावे असे वाटते त्यांच्यासाठी ‘नौदल’ हा करीयरचा उत्तम पर्याय आहे.
ज्यांना सर्वसामान्यांपेक्षा काही वेगळे साहसी करीयर करण्याची इच्छा आहे, उत्तम पगार, जग फिरण्याची संधी आणि समाजात मिळणारा मान यामुळे तरुण नौदलाकडे आकर्षित होत असले तरी आज मुलींनाही या क्षेत्रात संधी आहे.

स्वतःमध्ये विविध कौशल्ये नौदलाच्या माध्यमातून विकसित होऊ शकतात. स्वतःचे आणि कुटुंबाचे आयुष्य सुरक्षित होतेच. शिक्षण आणि कौशल्याच्या बळावर नौदलातील विविध विभागांसाठी अर्ज करता येतो. नॅशनल डिफेन्स ऍकॅडमी आणि इंडियन नेव्हल ऍकॅडमीसाठी दरवर्षी दोनदा संघ लोकसेवा आयोग म्हणजेच युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनमार्फत अखिल भारतीय स्तरावर स्पर्धा परीक्षा घेते.
अर्ज प्रक्रिया

इच्छुक उमेदवारांनी www.nausena-bharti.nic.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावा . वय आणि नावाबाबतची माहि ती ही शालान्त परीक्षेतील प्रमाणपत्रानुसारच असावी. ई-मेल, मोबाईल नंबर ही माहिती महत्त्वाची आहे. ऑनलाइन अर्ज भरताना २५ केबी आकाराचे पासपोर्ट छायाचित्र अपलोड करणे गरजेचे असते. अर्ज पाठवल्यानंतर दोन प्रतींमध्ये त्याच्या प्रती प्रिंट कराव्यात. दोन्ही प्रतींवर सही करावी. एक प्रत पोस्ट बॉक्स क्रमांक 4, चाणक्य पुरी पोस्ट ऑफिस नवी दिल्ली- ११००२१या पत्त्यावर पाठवावी. सोबत दहावी आणि बारावी परीक्षांच्या प्रमाणपत्रे/ गुणपत्रिका आणि इतर शैक्षणिक अर्हतेच्या छायांकित आणि राजपत्रित अधिकाऱयांनी स्वाक्षरांकित केलेल्या प्रती, स्व-स्वाक्षरांकित स्वतःचे छायाचित्र जोडावे.

मुलींसाठीही विशेष संधी
नौदलातील विविध कार्यकारी शाखांमध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशनद्वारे तरुणींनाही करीयर करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते.

अभियांत्रिकी विभाग
अभियांत्रिकी विभागात इंजिनीअर जनरल सर्व्हिस, इलेक्ट्रिकल जनरल सर्व्हिस आणि नेव्हल आर्किटेक्चर या पदासाठी अर्ज करावयाचा असेल तर बी.ई किंवा बी.टेक. ६० टक्क्यांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सबमरीन या पदासाठी बी.ई./बी.टेक. ५५ टक्क्यांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. इलेक्ट्रिकल या विभागात सबमरीन बी.ई./बी.टेक ५५ टक्क्यांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

आपली प्रतिक्रिया द्या