औषधात करीयर

47

औषध क्षेत्र… अर्थात फार्मसी. अभ्यासपूर्ण आणि फायदेशीर… कोणत्याही काळात…

फार्मास्युटिकल क्षेत्र आज वेगाने प्रगती करत आहे. फार्मसी ही अशी शाखा आहे ज्यामध्ये मंदीच्या काळातही नोकरी-व्यवसायाची संधी उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे आरोग्याशी संबंधित विषयांमध्ये आवड असल्यास फार्मसी या विषयात करीयर येते. विज्ञान शाखेतील विद्यार्थी आवडीनुसार बारावीनंतर फार्मासिस्ट किंवा बी. फार्म, एम. फार्मची पदवी मिळवू शकतात. पूर्वी फार्मास्युटिकल या विषयाचा अभ्यास ठरावीक संस्थांमध्येच शिकवला जात होता. आता मात्र या विषयाचा वाढता ट्रेंड पाहता बऱ्याचशा संस्थांमध्ये हा फार्मसीचा अभ्यासक्रम शिकवला जातो.

  • शैक्षणिक योग्यता
  • विज्ञान शाखेत बारावी पास झाल्यानंतर फार्मसी विषयावर डिप्लोमा करता येतो.
  • फार्मा रिसर्चमध्ये स्पेशलायझेशन करण्यासाठी ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फार्मा एज्युकेशन ऍण्ड रिसर्च’ या संस्थेत प्रवेश घेता येईल.
  • पीजी डिप्लोमा इन फार्मास्युटिकल, हेल्थ केअर मार्केटिंग, डिप्लोमा इन फार्मा मार्केटिंग, ऍडव्हान्स डिप्लोमा इन फार्मा मार्केटिंग किंवा पीजी डिप्लोमा इन फार्मा मार्केटिंग असे काही कोर्सेस करता येतात.

महत्त्व
डी. फॉर्मा आणि बी. फॉर्मा कोर्समध्ये औषधांशी संबंधित थिअरॉटिकल आणि प्रायोगिक स्तरावरील माहिती दिली जाते. ज्याचा उपयोग फार्मसीचा उद्योग करण्यासाठी आवश्यक असते. याशिवाय फार्माकोलॉजी, इंडस्ट्रियल केमिस्ट्री, हॉस्पिटल ऍण्ड क्लिनिकल फार्मसी, फॉर्मास्युटिकल, हेल्थ एजुकेशन, बायोटेक्नोलॉजी इत्यादी विषयांची माहितीही दिली जाते. फार्मसीत प्रवेशासाठी लाईफ सायन्स, औषधांप्रती आवड असायला हवी. शिवाय या विषयांशी संबंधित रिसर्च करण्यासाठी बौद्धिक विश्लेषणाची क्षमता आणि शैक्षणिक गुणवत्ताही चांगली असावी लागते.

फार्मास्युटिकल्स क्षेत्रात करीयरचे पर्याय

रिसर्च ऍण्ड डेव्हलपमेंट
नवनवीन औषधांचा सतत शोध घेणे आणि त्यासंबंधी विकासाचे कार्य यामध्ये करता येते. यामध्ये जेनेरिक उत्पादनांचा विकास, एनालिटिकल आर. ऍण्ड डी. एपीआय (ऍक्टिव फार्मास्युटिकल इन्ग्रेडिएंटस्) इत्यादी विषयांमध्ये स्पेशलाइजेशन करण्याची संधी असते.

ड्रग मॅन्युफॅक्चरिंग
या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना प्रगती करण्यासाठी ही एक महत्त्वपूर्ण शाखा. यात मॉलिक्युलर बॉयोलॉजिस्ट, मेडिकल इंवेस्टिगेटर किंवा फार्मेकोलॉजिस्ट बनता येऊ शकते.

क्लिनिकल रिसर्च
औषध बाजारात लाँच होताना ते औषध किती सुरक्षित आहे ते पाहायला क्लिनिकल रिसर्च केले जाते. बऱयाचशा विदेशी कंपन्या आज देशभरात रिसर्च करण्यासाठी उपलब्ध होत आहेत.

क्वॉलिटी कंट्रोल
फार्मास्युटिकल इंडस्ट्रीचे हे एक महत्त्वाचे अंग आहे. नव्या औषधांशी संबंधित विकास आणि त्याचे परिणाम यावर संशोधन कार्य यामध्ये येते.

ब्रांडिंग ऍण्ड सेल्स
या शाखेतील विद्यार्थी सेल्स ऍण्ड मार्केटिंगमध्ये करीयर करू शकतात. यामध्ये काम करण्यासाठी बी. फार्मासह एमबीएची पदवीही आवश्यक आहे.

आपली प्रतिक्रिया द्या