सिंगापूर ओपन: सिंधूचे आव्हान संपले

13

सामना ऑनलाईन । सिंगापूर

सिंगापूर ओपन सुपर सिरिज बॅडमिंटन स्पर्धेतील पी. व्ही. सिंधू हिचे आव्हान संपुष्टात आले. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात स्पेनच्या कॅरोलिना मरिनने सिंधूवर ११-२१, १५-२१ असा विजय मिळवला. अवघ्या ३५ मिनिटांत सामना संपला.

संपूर्ण सामन्यात कॅरोलिनाने सिंधूवर वर्चस्व गाजवून तिला निष्प्रभ केलं. कॅरोलिनामुळे सिंधूला सामन्यात पुनरागमन करण्याची एकही संधी मिळू शकली नाही. याआधी काही दिवसांपूर्वी इंडियन ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सिंधूने कॅरोलिनाला नमवत जेतेपद मिळवले होते. रिओ ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीतही कॅरोलिनाने सिंधूवर विजय मिळवला होता.

आपली प्रतिक्रिया द्या