गुजरातमधील कोळसा खाण दुर्घटना; भाजपच्या 2 नेत्यांसह 4 जणांवर गुन्हा दाखल

गुजरातमधील सुरेंद्रनगर जिह्यातील एका कथित बेकायदा कोळसा खाणीत शनिवारी संध्याकाळी उशिरा तीन मजुरांचा श्वास गुदमरून मृत्यू झाला. या प्रकरणी भाजपच्या दोन नेत्यांसह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विराम केरलिया, लक्ष्मण दाभी आणि खोडा मकवाना अशी या तीन दुर्दैवी कामगारांची नावे आहेत. स्थानिक भाजप नेते खिमजी सराडिया, कल्पेश परमार यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सारडिया हे भाजपच्या तिकीटावर निवडून आलेल्या सुरेंद्रनगर जिल्हा पंचायतीच्या सदस्या सजनबेन सराडिया यांचे पती आहेत. परमार हे भाजपशासित मुळी तालुका पंचायतीच्या कार्यकारिणीचे अध्यक्ष आहेत.