बलात्कार पीडितेची ओळख उघड केल्याप्रकरणी भाजप आमदारावर गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणाचे व्हिडीओ आणि फोटो प्रसिद्ध केल्याप्रकरणी भाजप आमदार रघुनंदन राव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात अबिडस पोलीस ठाण्यात कलम 228 ए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. राव यांनी बलात्कार प्रकरणाशी संबंधित काही व्हिडीओ आणि फोटो प्रसिद्ध करत या घटनेत एमआयएम पक्षाच्या आमदाराच्या मुलाचा समावेश असल्याचा आरोप केला होता.