शीख समाजाच्या भावना दुखावल्या; अनुराग कश्यपविरोधात गुन्हा

974

‘सेक्रेड गेम्स-2’ या वेबसीरिजमध्ये शीख समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी या वेबसीरिजचा दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे प्रवक्ते तेजेंद्रपालसिंह बग्गा यांनी दिल्ली पोलिसांत त्यांच्याविरोधात एफआयआर नोंदवली. ‘सेक्रेड गेम्स-2’मध्ये सैफ अली खान याने सरताज सिंग नावाच्या पोलीस अधिकाऱयाची भूमिका केली आहे. या एका दृश्यात सरताज सिंग आपल्या हातातील कडा काढून समुद्रात फेकून देतो. यावर आक्षेप घेण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या