बदलीचा घेतला गैरफायदा, जेलरनंच केलं महिला अधिकारीचं लैंगिक शोषण

2822
crime women

जेलरचं आपल्या कनिष्ठ महिला अधिकाऱ्यावर प्रेम जडलं. त्यांचे संबंध वाढत गेले. लग्नाच्या आणाभाका ही घेतल्या गेल्या. मात्र काही दिवसांनी दोघांची ट्रान्सफर झाली आणि त्याचाच गैरफायदा घेत जेलरनं त्या महिला अधिकाऱ्यासोबतचं आपले संबंध तोडून टाकले आणि दुसऱ्या मुलीशी लग्न केलं. त्यामुळे महिला अधिकारी संतापली आणि तिनं जेलर विरोधात तक्रार दाखल केली.

जबलपूर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सेंट्रल जेलमध्ये ही घटना घडली. दोन्ही अधिकाऱ्यांचे संबंध जुळले. 2016 मध्ये जेलर प्रशांत चौहान आणि कनिष्ठ महिला अधिकारी यांची ओळख झाली आणि हळूहळू त्याचं रुपांतर प्रेमात झालं. पण चौहान महिलेवर प्रेम करत नव्हता तर तिचं लैंगिक शोषण सुरू होतं, असा आरोप या महिलेने केला आहे.

2016 पासून पुढे ते एकमेकांच्या अगदी जवळ आले. चौहानने तिला लग्न करेन असंही आश्वासन दिलं होतं. मात्र त्याची बदली सिवनी मध्ये झाली आणि महिला अधिकाऱ्याची बदली नरसिंहपूर येथे झाली. त्यानंतर महिला अधिकारीने त्याच्याजवळ लग्नासाठी हट्ट धरला. आपल्या घरून दबाव आहे असं कारण चौहान पुढे करू लागला. महिलेला शंका आली मात्र तरीही तिने प्रयत्न सोडला नाही. अशातच 15 नोव्हेंबर रोजी चौहान याने दुसऱ्या मुलीशी विवाह केला.

हे कळाल्यावर महिला अधिकारी संतापली. तिने पोलीस निरीक्षक अमित सिंह यांच्याकडे जेलर विरोधात तक्रार करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर आता आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेतला जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या