कोपरगाव तालुक्यातील कुभांरी शासकीय वाळु डेपो ठेकेदार श्रीकांत गोमासे यांचेवर संरक्षित वनामधुन विनापरवाना रस्ता तयार करुन शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने जिल्ह्यातील शासकीय यंत्रणे मध्ये खळबळ उडाली आहे.
माहेगाव देशमुख येथील सामाजिक कार्यकर्ते नवनाथ वाघ यांनी कोपरगाव वन विभागाकडे माहेगाव देशमुख संरक्षित वनामधुन वाळु वाहतूक करणेकामी सातशे मिटर लांबी च्या पुढे मुरुम टाकून रस्ताच्या आड येणार्या वनामधिल 250 च्यावर(प्रासिपिस)वेडीबाभुळ झाडांचे नुकसान केल्या प्रकरणी कोपरगाव वनपरिक्षेत्राचे परिमंडळ वन अधिकारी बि. एन गाढे यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. याची दखल घेत वनविभागाने तातडीने कार्यवाही करत श्रीकांत गोमासे संगमनेर यांचेवर भारतीय वन अधिनियम 1972 चे कलम 26(2) अ ड ह फ ग अन्वये शासकिय मालमत्तेचे अंदाजे 50 हजार रुपये नुकसान केल्या प्रकरणी वनपाल बि. एन गाढे यांनी गुन्हा नोदंवत वनसंरक्षक अहमदनगर यांना पुढील कार्यवाही साठी रिपोर्ट सादर केला.
याबाबत अधिक माहिती देताना वनपाल गाढे यांनी पुढे सांगितले की विनापरवाना रस्त्ता तपासणी करत असतांना, ‘सदर रस्त्याने डंपर वरिल ड्रायव्हर याने कुंभारी सरकारी वाळु डेपोसाठी वाहतूक करत असल्याचे सांगितले. राखीव वनामधुन रस्ता तयार करुन शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याने डंपर कारवाई साठी कोपरगाव येथे घेवून जात असतांना वाळु डेपो चालक यांनी भ्रमणध्वनी द्वारे फोन करुन दबावाखाली डेपो मध्ये डंपर मधिल वाळु खाली करुन डंपर पळवल्याचे गाढे यांनी आपल्या तक्रार अहवालात नमूद केले आहे .
आदिवासी बांधवांनी वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण केल्यास वनविभाग तातडीने अटकेची कारवाई करते, आम्हास एक व दुसऱ्यास वेगळा न्याय – उत्तम पवार, एकलव्य संघटना
मोफत वाळू योजने अंतर्गत मिळणारे लाभ गरीब लोकांना घर बांधण्यासाठी मोफत वाळू मिळते, या योजने अंतर्गत 5 ब्रास पर्यंत मोफत वाळू गरीबांना मिळते.सोबतच 5 ब्रास पेक्षा जास्त वाळू पाहिजे असेल, तर प्रती ब्रास 600 रुपये दराने वाळू खरेदी करता येते.लाभार्थ्यांना केवळ वाळू वाहतूकीचा खर्च लागतो. मात्र प्रत्यक्षात वाळू दोन ते अडीच हजार रुपये ब्रास मिळते