सावित्रीबाई फुलेंवर आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या वेबसाईटविरोधात गुन्हा दाखल

हिंदुस्थानच्या पहिल्या शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या इंडिक टेल्स आणि हिंदू पोस्ट या वेबसाईटविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘इंडिक टेल्स’ या वेबसाईटने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी प्रसिद्ध केलेल्या लेखामध्ये त्यांच्याबद्दल अनेक आक्षेपार्ह गोष्टी लिहिल्या आहेत. या गोष्टीबाबत अनेक राजकीय, सामाजिक संस्थांनी शासनाकडे आक्षेप नोंदवले होते. दरम्यान, बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुंबईच्या पोलीस आयुक्तांची भेट घेतली होती.

विविध संघटनांनी दिलेल्या तक्रारीची दखल घेत आझाद मैदान पोलीस ठाण्यात इंडिक टेल्स आणि हिंदू पोस्ट या वेबसाईट्स विरोधात भादवि कलम 500, 505(2) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.