नाईट मॅजिक अंधारातही फोटो काढणारा फोन लॉन्च

68
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
तुमचा मोबाईल अंधारात फोटो काढू शकतो का? नाही ना! मात्र ‘अॅट फोन्स’ने ‘कॅट-एस ६०’ नावानं नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन लॉन्च केला आहे. याचं खास वैशिष्ट्य म्हणजे याचा कॅमेरा. स्मार्टफोनमध्ये असणाऱ्या थर्मल कॅमेऱ्याच्या सहाय्यानं अंधारातही  स्पष्ट दिसणार आहे. स्मार्टफोनमध्ये थर्मल कॅमेऱ्यासह १३ मेगापिक्सलचा रियर आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
अंधारातही उजेड दाखवणाऱ्या स्मार्टफोनची किंमत फक्त ६४ हजार ९९९ इतकी आहे. १७ मार्चपासून हा स्मार्टफोन नागरिकांना खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. हा स्मार्टफोन धूळ, विज आणि पाण्यापासून सुरक्षित राहू शकतो, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.
‘कॅट-एस ६०’  ची वैशिष्ट्य
१)थर्मल कॅमेरा जो अंधारातही काम करू शकेल
२)४.७ इंचांचा एचडी डिस्प्ले
३)४ जीबी रॅम
४)३८०० एसएएच ची जबरदस्त बॅटरी
आपली प्रतिक्रिया द्या