तेजस्वी यादव यांची 25 मार्चला सीबीआय चौकशी

लँड फॉर जॉब्स घोटाळय़ाप्रकरणी राजद नेते, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव 25 मार्चला सीबीआयसमोर चौकशीला हजर राहणार आहेत. तेजस्वी चौकशीसाठी तपास यंत्रणेपुढे हजर झाले तर त्यांना अटक केली जाईल, असे तेजस्वी यांच्या वकिलांनी दिल्ली हायकोर्टाला सांगितले. त्यावर सीबीआयने तेजस्वी यांना अटक करण्याचा आपला कोणताही हेतू नसल्याचे कोर्टाला सांगितले. तेजस्वी यांनी केवळ चौकशीसाठी आमच्यापुढे हजर व्हावे. कारण त्यांना काही दस्तावेज दाखवायचे आहेत. ते चौकशीसाठी व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे हजर झाले तर त्याचा कोणताही फायदा होणार नाही