CBSE Result 2020 बारावीचा निकाल 88.78%, यंदाही मुलींनीच मारली बाजी

732

केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाचा CBSE (Central Board of Secondary Education, CBSE) बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यंदाही मुलींनीच बाजी मारली असून मुलींचा निकाल मुलांपेक्षा 5.96 टक्क्यांनी अधिक लागला आहे. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 92.15 टक्के आहे. तर 86.19 टक्के मुलगे उत्तीर्ण झाले आहेत. 66.67 टक्के ट्रान्सजेंडर उत्तीर्ण झाले आहेत.

screenshot_20200713-133252_drive_copy_700x450

विशेष म्हणजे यंदाच्या वर्षी 88.78 टक्के निकाल लागला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत हा निकाल 5 टक्क्यांनी अधिक आहे. या निकालात त्रिवेंद्रम विभागाने बाजी मारली असून 97.67 टक्के इतका निकाल लागला आहे. तर पाटणा विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 74.57 टक्के इतका लागला आहे. पुणे विभागाचा निकाल 90.24 टक्के लागला आहे.

कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे बारावीच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या होत्या. या परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. बारावीचे विद्यार्थी CBSE बोर्डाचे निकाल cbseresults.nic.in च्या अधिकृत वेबसाइटवर विद्यार्थ्यांना पाहता येणार आहेत. परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर लागेल. रोल नंबर टाकून निकालाची ऑनलाईन प्रत आपण पीडीएफ स्वरुपात मिळणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या