VIDEO – पिझ्झावर केसांचे टॉपिंग,फुकट्या महिलेचा पराक्रम

72

सामना ऑनलाईन, संदरलँड

लंडनमधल्या द पिकॉक या हॉटेलमध्ये घडलेला धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. एका महिलेने पिझ्झा खाता-खाता स्वत:चे केस उपटले आणि पिझ्झावर पसरून ठेवले. तिच्या मैत्रिणीने देखील यात तिला मदत केली. केस पसरून झाल्यानंतर या दोघींनी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांकडे तक्रार केली की पिझ्झामध्ये केस आहेत. याबद्दल कर्मचाऱ्यांनी माफी मागितली आणि त्यांनी मागवलेल्या ऑर्डरसाठी आपण पैसे घेणार नसून नवा पिझ्झा आणि दारू तुम्हाला मोफत देऊ असं सांगितलं.

कर्मचाऱ्यांनी सुरुवातीला याप्रकाराकडे फारसे लक्ष दिलं नाही, मात्र एका कर्मचाऱ्याने केस बारकाईने बघितल्यानंतर असे केस संपूर्ण हॉटेलमध्ये कोणाचेच नसल्याचं त्याला निदर्शनास आलं. संशय आल्याने कर्मचाऱ्यांनी आणि हॉटेलमध्ये व्यवस्थापकांनी सीसीटीव्ही फुटेज बघितलं. हे फुटेज बघितल्यानंतर या महिलेनेच केस टॉपिंगसारखे पिझ्झावर पसरून ठेवल्याचं दिसलं.

आपली प्रतिक्रिया द्या