पाकिस्तानकडून पुन्हा सीमेवर गोळीबार, एक जवान शहीद

731

पाकिस्तानकडून जम्मू कश्मीरमधील नौशेरा सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. पाकिस्तानच्या या गोळीबारात गोरखा रेजिमेंटचे जवान राजीब थापा शहीद झाले आहेत. या गोळीबाराला हिंदुस्थानने चोख प्रत्युत्तर दिले.

 

याआधी 18 ऑगस्टला पाकिस्तानने राजौरी जिल्ह्याजवळ नौशेरा सेक्टरमध्ये गोळीबार केला होता. या गोळीबारात जवान लान्सनायक संदीप थापा हे शहीद झाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या