अवकाळी पावसाचा महाराष्ट्राला फटका, केंद्रीय पथक उद्यापासून राज्याच्या दौऱ्यावर

264

 अवकाळी पावसामुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारचे पथक 22 नोव्हेंबरपासून राज्याच्या दौऱयावर येत आहे. पुढील तीन दिवस हे पथक विविध भागांना भेटी देऊन तेथील शेतकऱयांशी संवाद साधणार आहे. त्यानंतर नुकसानीचा अहवाल केंद्राकडे सादर करेल अशी माहिती राज्य आपत्कालीन व्यवस्थापन विभागातील अधिकाऱयांनी बुधवारी दिली.

ऑक्टोबरमध्ये अवकाळी पावसाचा फटका बसून संभाजीनगर (औरंगाबाद), अमरावती आणि नाशिक आदी भागांतील शेतीचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. जवळपास 94,53,139 हेक्टरवरील शेती पावसाने उद्ध्वस्त केली. या नुकसानीची झळ बसलेल्या शेतकऱयांची संख्या एक कोटीहून अधिक आहे. संभाजीनगर  विभागाला सर्वाधिक फटका बसला असून सोयाबीन आणि कापसाचे मोठय़ा प्रमाणावर उत्पादन पाण्यात गेले. या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्राचे पाचसदस्यीय पथक शुक्रवारी राज्याच्या दौऱयावर येत आहे. हे पथक केंद्र सरकारला अहवाल सादर करणार आहे.

राज्याने केंद्राकडे मागितली 7207.79 कोटींची मदत

नुकसानग्रस्त शेतकऱयांना मदत करण्यासाठी राज्याने केंद्र सरकारकडे आतापर्यंत 7207.79 कोटींची मदत मागितली आहे. राष्ट्रीय आपत्ती सहाय्य निधीतून ही आर्थिक मदत देण्याची विनंती राज्य सरकारने केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या