कामाच्या ठिकाणीही लसीकरण सुरू होणार, केंद्र सरकारची मंजुरी

कोरोनाचा झपाटय़ाने होत असलेला फैलाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने सर्व खासगी व सरकारी कार्यालयांतही लसीकरण सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. ज्या कार्यालयांत 45 वर्षांवरील किमान 100 लोक लस घेण्यास इच्छुक असतील, त्या कार्यालयांत लसीकरणाची व्यवस्था केली जाईल. याबाबत राज्यांनी 11 एप्रिलपर्यंत आवश्यक ती व्यवस्था करावी, अशा सूचना केंद्राने दिल्या आहेत.

देशात कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे राजेश भूषण यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य सचिवांना पत्र पाठवले आहे. अर्थव्यवस्थेच्या संघटीत क्षेत्रात 45 वर्षांपुढील कर्मचार्यांची संख्या अधिक आहे. हे लोक सरकारी आणि खासगी कार्यालये, बांधकाम तसेच विविध सेवांशी संबंधित व्यवसायांत कार्यरत आहेत. या लोकसंख्येपर्यंत वेळीच कोरोना लस पोहोचवण्यासाठी सर्व खासगी व सरकारी कार्यालयांत लसीकरण राबवण्याचा निर्णय घेतला जात आहे, असे केंद्रीय आरोग्य सचिवांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

n कामाच्या ठिकाणची कोरोना लसीकरण केंद्रे 11 एप्रिलपासून सुरू केली जाऊ शकतात. संबंधित कार्यालयात कोरोनाची लस घेण्यासाठी पात्र तसेच इच्छुक असलेल्या कर्मचार्यांची संख्या किमान 100 किंवा त्याहून अधिक असली पाहिजे. याबाबत तयारीसाठी राज्य सरकारांनी पंपन्या व त्यांच्या व्यवस्थापनांशी विचारविनिमय करावा, अशी सूचना केंद्र सरकारने केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या