कश्मीर पोलिसांना मिळणार बुलेटप्रुफ वाहनं – राजनाथ सिंह

18

सामना ऑनलाईन । श्रीनगर

जम्मू-कश्मीर पोलिसांना बुलेटप्रुफ वाहनं मिळणार आहेत. केंद्र सरकारने बुलेटप्रुफ वाहनांच्या खरेदीसाठी निधी दिल्याचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. राजनाथ सिंह सध्या जम्मू-कश्मीरच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. अनंतनाग जिल्ह्यातील अचबल भागामध्ये १६ जुनला फिरोज अहमद आणि सहा पोलिसांची दहशतवाद्यांनी हत्या केली होती. त्यावेळी राजनाथ सिंह यांनी कश्मीर पोलिसांनी बुलेटप्रुफ वाहनं देण्याची घोषणा केली होती.

केंद्र सरकारने जम्मू-कश्मीर पोलिसासाठी बुलेटप्रुफ वाहनांच्या खरेदीसाठी निधी दिला आहे. तसेच पोलिसांसाठी ट्रॉमा सेंटर उघडण्यासाठीही केंद्राकडून निधी देण्यात आल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले. सतत दहशतवादी हल्ल्यांच्या छायेखाली असणाऱ्या कश्मीरच्या सुरक्षेसाठी पोलिसांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे राजनाथ सिंह म्हणाले.

राजनाथ सिंह यांच्या दौऱ्यादरम्यान अनंतनाग येथे दहशतवाद्यांनी पोलीस पथकावर केलेल्या हल्ल्यात एक पोलीस शहीद झाला, तर दोन जण जखमी झाले होते. राजनाथ सिंह यांच्या बैठकीच्या ठिकाणापासून काही अंतरावरील बस स्थानकात हा हल्ला करण्यात आला होता.

आपली प्रतिक्रिया द्या