डाळ निर्यातीवरील सर्व निर्बंध हटवले

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

डाळींचे विक्रमी उत्पादन झाल्यामुळे केंद्र सरकारने डाळ निर्यातीवरील सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे. निर्यातीवरील निर्बंध हटवल्याने डाळीला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे.

यंदा देशात २२० लाख टनपेक्षा जास्त डाळींचे उत्पादन झाले आहे. मागच्यावर्षी डाळींचे उत्पादन १७९ लाख टन होते. डाळींचे उत्पादन आणि मागणी यात तफावत असल्याने निर्यातीवर निर्बंध घालण्यात आले होते. मात्र यंदा विक्रमी उत्पादन झाल्यामुळे निर्बंध हटवण्यात आले आहेत. चणा डाळीच्या उत्पादनात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ३२ टक्क्यांनी वाढ झाली. तर अन्य डाळींच्या उत्पादनात सुमारे २२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. निर्यात बंदी हटवल्याने आता शेतकऱ्यांना मोठी बाजारपेठ खुली झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या