‘भारत बाँड ईटीएफ’ योजना पुन्हा होणार सुरू; 14 जुलैपासून गुंतवणूकीची संधी

आपण जर सुरक्षित गुंतवणूकीबद्दल विचार करत असाल तर ‘भारत बाँड ईटीएफ’ आपल्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. ही योजना डिसेंबरमध्ये लॉन्च करण्यात आली होती. मात्र आता याचा दुसरा टप्पा 14 जुलैपासून सुरू होणार आहे. म्हणजेच 14 जुलैपासून भारता बॉन्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करण्याची आणखी एक संधी मिळणार आहे. चला तर याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ…

देशातील पाहिले कॉर्पोरेट बाँड

भारत बॉन्ड ईटीएफ हे देशातील पहिले कॉर्पोरेट बाँड आहे. या बाँडचे दोन मॅच्युरिटी कालावधी असतात. पहिला मॅच्युरिटी कालावधी तीन वर्षांचा असतो, तर दुसरा मॅच्युरिटी कालावधी 10 वर्षांचा असतो. ही योजना डिसेंबर 2019 मध्ये सुरू करण्यात आली होती. भारत बाँड ईटीएफचा दुसरा टप्पा 14 जुलैपासून सुरू होणार आहे. याचा पूर्ण आकार 14 हजार कोटी रुपयांचा आहे. हा टप्पा 14 जुलैला सुरू होऊन 17 जुलैला बंद होईल.

बाँड का जारी करण्यात आला?

सर्वसाधारणपणे वित्तीय तूट भरून काढण्यासाठी सरकार बाँड जारी करतात. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांसाठी (पीएसयू) पैसे गोळा करण्याकरता सरकारने गुंतवणूकदारांसमोर हा पर्याय ठेवला आहे. पूर्वी सरकारे केवळ मोठ्या गुंतवणूकदारांसाठी बाँड लॉन्च करत होते. मात्र आता छोटे गुंतवणूकदारदेखील यात सामील होऊ शकतात. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी प्रत्येक बाँडची किंमत 1000 रुपये ठेवण्यात आली आहे.

गुंतवणूकीचे फायदे काय आहेत?

सरकारच्या म्हणण्यानुसार, यात धोका खूपच कमी आहे. तसेच मुदत ठेवीपेक्षा परतावा जास्त आहे. एकीकडे बँका एफडीमधून व्याज दर सातत्याने कमी करीत असताना, दुसरीकडे भारत बाँड ईटीएफ अपेक्षेपेक्षा चांगले उत्पन्न देऊ शकते.

आपली प्रतिक्रिया द्या