सत्ताधाऱ्यांविरोधात असलेल्या लाटेचा फटका बसू नये म्हणून राष्ट्रपती राजवट लावतील, पृथ्वीराज चव्हाण यांचा अंदाज

महायुती सरकारला अ‍ॅन्टी इनकम्बन्सीचा म्हणजेच सत्ताधाऱ्यांविरोधात असलेल्या लाटेचा फटका बसू नये म्हणून राष्ट्रपती राजवट लावतील अशी शंका माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. तसेच राजकीय आरक्षण देऊनही अनेक ठिकाणी निवडणुका घेण्यात आल्या नाही तर या आरक्षणाचा फायदाच काय असेही चव्हाण म्हणाले.

एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, आता राज्यात निवडणूक झाली तर महायुतीला पराभवाची भिती आहे. अशावेळी राज्यात राष्ट्रपाती राजवट लावली जाऊ शकते. राज्यातील गृहमंत्रालय थातूर मातूर कारणं देऊन केंद्र सरकारकडे अहवाल पाठवू शकतात. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय विरोधात जाऊन अनेक आमदार अपात्र ठरू शकतात. हा निर्णय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा असेल. पण राष्ट्रपती राजवट लावून काही महिने या विधानसभा निवडणूक पुढे ढकलल्या जातील. त्यामुळे काही निर्णय घेऊन अ‍ॅन्टी इनकम्बन्सी निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न केला जाईल. हा संपूर्ण राजकीय निर्णय असणार आहे असेही चव्हाण म्हणाले.