संसदेत ‘खेला होबे’चा नारा! लोकसभा अध्यक्षांच्या दिशेने कागदपत्रे भिरकावली

parliament

पेगॅसस हेरगिरी प्रकरणावरून विरोधकांचा आक्रमक पवित्रा कायम असून, संसदेत मोदी सरकारची काेंडी झाली आहे. बुधवारी लोकसभेत ‘खेला होबे’चे नारे घुमले. गोंधळात लोकसभा अध्यक्षांच्या दिशेने कागदपत्रे भिरकावली. यामुळे 10 खासदारांवर निलंबनाची टांगती तलवार आहे. राज्यसभेतही कामकाज झाले नाही. दोन्ही सभागृहांचे कामकाज उद्या (दि. 29) सकाळी 11 पर्यंत तहकूब करण्यात आले.

या खासदारांवर निलंबनाची टांगती तलवार

लोकसभा अध्यक्षांच्या दिशेने कागदपत्रे भिरकावल्यामुळे सभागृहात गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवून दहा खासदारांना निलंबित केले जाऊ शकते असे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे. यामध्ये टी. एन. प्रथापन, गुरजित सिंग, मणिकम टागोर, ए. एम. आरीफ, सत्तगिरी संकर उल्का, श्वनितसिंग बिट्टू, हिबी ईडेन यांचा समावेश असल्याचे म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या